
हैदराबाद : स्वपक्ष सोडून अन्य पक्षांत जाणाऱ्या तेलंगणमधील आमदरांच्या मुद्दावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निर्णय सुनावला. सत्ताधारी काँग्रेस पक्षात सहभागी झालेल्या ‘भारत राष्ट्रीय समिती’च्या (बीआरएस) दहा आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकर निर्णय घेण्याचे आणि कोणत्याही परिस्थितीत तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ न घेण्याचे निर्देश तेलंगण विधानसभेला दिले.