

Supreme Court
esakal
जिल्हा परिषदांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. याआधी ३० जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यात आता मुदतवाढ देण्यात आलीय. आता १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून आचारसंहिता लागू होऊ शकते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात दाखल जालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.