

Chief Justice Surya Kant Clarifies Law on Attempt to Rape पायजम्याची नाडी तोडणे हा बलात्काराचा प्रयत्न ठरत नसल्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने असहमती दर्शवली आहे. उच्च न्यायालयाच्या त्या निकालावरून मोठी राळ उडाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महिलेची छेड काढणे, पायजम्याची नाडी काढणे, स्तन पकडणे हे बलात्काराच्या प्रयत्नाच्या श्रेणीत येते, असे सांगत सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमल्या बागची आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला.