
भारताच्या दारू उद्योगातील एका महत्त्वाच्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयाने नुकताच ऐतिहासिक निकाल दिला आहे. फ्रेंच दारू उत्पादक कंपनी पेर्नो रिकार्ड आणि इंदूर येथील उद्योजक करणवीर सिंह छाब्रा यांच्या जेके एंटरप्रायझेस यांच्यातील ‘प्राइड’ या शब्दावरून सुरू असलेला वाद आता संपुष्टात आला आहे. पेर्नो रिकार्डच्या ‘ब्लेंडर्स प्राइड’ आणि ‘इम्पिरियल ब्लू’ या ब्रँड्सना छाब्रा यांच्या ‘लंडन प्राइड’ने आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, ‘प्राइड’ हा शब्द सामान्य आहे आणि त्यावर कोणत्याही कंपनीचा एकाधिकार असू शकत नाही.