

Supreme Court Exists to Protect Liberty, Not Suppress Rights: Justice Ujjwal Bhuyan’s Strong Message
esakal
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालय हे नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे आणि मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी निर्माण झाले आहे, त्यांना स्वातंत्र्यापासून दूर ठेवण्यासाठी किंवा हक्कांचे उल्लंघन मान्य करण्यासाठी नाही. असा स्पष्ट आणि कठोर संदेश न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी दिला. गोव्यात अॅडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात बोलताना त्यांनी हे मत मांडले.