Supreme Court: सुप्रीम कोर्टाने हाय कोर्टाचे २८ निर्णय का रद्द केले; नेमकं काय घडलं होतं, काय होतं प्रकरण?

Supreme Court Orders Fresh Review of 28 Foreigners Tribunal Cases : परदेशी घोषित करण्यापूर्वी निष्पक्ष आणि कायदेशीर प्रक्रिया आवश्यक असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने गुवाहाटी उच्च न्यायालयाचे २८ निर्णय रद्द करून प्रकरणे नव्याने सुनावणीसाठी पाठवली.
Supreme Court

Supreme Court Foreigners Order

sakal

Updated on

Supreme Court Foreigners Order: एखाद्या व्यक्तीला परदेशी घोषित करण्याचा निर्णय हा केवळ औपचारिक प्रक्रिया नसून तो घटनात्मक आणि कायदेशीर निकषांनुसार निष्पक्ष, वैध आणि वाजवी पद्धतीनेच घेतला गेला पाहिजे, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने गुवाहाटी उच्च न्यायालयाचे २८ निर्णय रद्द केले आहेत. या प्रकरणांपैकी २७ प्रकरणांत परदेशी न्यायाधिकरणाने संबंधित व्यक्तींना परदेशी घोषित केले होते आणि त्या आदेशांना उच्च न्यायालयानेही मान्यता दिली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व निर्णय रद्द करून संबंधित प्रकरणे नव्याने सुनावणीसाठी परदेशी न्यायाधिकरणांकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com