Supreme Court : १०० टक्के इथेनॉल इंधन कुठून येणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

Supreme Court Questions 100% Ethanol Fuel Supply : १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांसाठी इंधनाचा पुरवठा कसा होणार? सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सवाल करत शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा मुद्दाही उपस्थित केला.
The Supreme Court of India questions the central government about the availability and supply of 100% ethanol fuel for E100 vehicles, while highlighting farmers' welfare and environmental concerns

The Supreme Court of India questions the central government about the availability and supply of 100% ethanol fuel for E100 vehicles, while highlighting farmers' welfare and environmental concerns

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : देशात १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली असताना, या वाहनांसाठी आवश्यक इंधनाचा पुरवठा कशा पद्धतीने केला जाणार, असा महत्त्वपूर्ण सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष २०२५-२६ साठी इथेनॉलच्या वाटपाशी संबंधित याचिकांवर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या माध्यमांतील वृत्तांचा संदर्भ देत सरकारकडून इंधन उपलब्धतेबाबत स्पष्टीकरण मागितले.

Loading content, please wait...