

Supreme Court Pulls Up Petitioner For Filing AI Generated PIL
Esakal
Supreme Court Warns Petitioner Over Frivolous AI Based Petition आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केलीय. एका जनहित याचिकेवर सुनावणीवेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला कठोर शब्दात सुनावलं. याचिकाकर्त्याने एआयचा वापर करून याचिका दाखल केली होती. त्यात देण्यात आलेले संदर्भ हे तथ्यहीन होते. सरन्यायाधीशांनी सज्जड दम देताच याचिकाकर्त्याच्या वकिलांनी याचिका एआयच्या मदतीने लिहिल्याचं सांगण्यात आलं. सरन्यायाधीश म्हणाले की, अशा प्रकारे पुन्हा याचिका दाखल करू नका आणि भविष्यात असे प्रकार घडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.