Supreme Court Questions Form 6 Rule in Delhi SIR Case
esakal
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवरून सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. दिल्लीतील SIR प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी २०२६ च्या मतदार यादीत आधीच नाव असलेल्या नागरिकांना पुन्हा नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी Form 6 भरण्यास का सांगितलं जात आहे, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. या प्रकरणात निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.