

Form 6 Voter Registration Rules Supreme Court Questions Election Commission on Address Change and Electoral Roll Updates in India
sakal
नवी दिल्ली : ‘‘देशातील ज्या नागरिकांचा पत्ता बदलला आहे, त्यांना ‘फॉर्म ६’ भरण्यासाठी का सांगितले जात आहे,’’ अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिल्लीच्या मतदारयादी सखोल फेरपडताळणी (एसआयआर) मोहिमेच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीवेळी केली. ‘एन्युमरेशन’ फॉर्म आणि ‘फॉर्म ८’ भरण्यासाठी लोकांना संधी दिली जावी, अशी टिप्पणी यावेळी सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केली.