

Supreme Court Raises Tough Questions on Pasmanda Muslim OBC Quota Demand
esakal
सर्वोच्च न्यायालयाने पसमंदा मुस्लिम समुदायाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) श्रेणीत नोकऱ्या व शैक्षणिक प्रवेशासाठी आरक्षण देण्याच्या मागणीवर सुनावणी करताना मुस्लिम समाजातील विविध मागास घटकांची सविस्तर माहिती मागितली. सोमवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश सूर्यकांत व न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.