Supreme Court: एकाच प्रकरणात वारंवार न्यायाधीशांची माघार; न्याय कोण देणार? CJI सूर्यकांत संतापले; हायकोर्टाला विचारला जाब

Supreme Court Directs Daily Hearing After Multiple Judge Recusals : अमरीश कुमार जैन याचिकेवर सुनावणी टाळल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा गंभीर इशारा; न्यायाधीशांना माघार न घेण्याचे निर्देश, वकिलांच्या दबावतंत्रावरही ताशेरे
CJI Surya Kant

CJI Surya Kant

Esakal

Updated on

CJI Surya Kant : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात २०२२ पासून प्रलंबित असलेल्या एका याचिकेत न्यायाधीश सातत्याने स्वतःला खटल्यापासून दूर करत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शील नागू यांचाही समावेश असल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने याबाबत कठोर भूमिका घेत उच्च न्यायालयाला द्विसदस्यीय खंडपीठ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com