

Supreme Court Voices Concern Over AI in Judicial Process कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून याचिका तयार करत त्या दाखल करणाऱ्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फटकारले आहे. याचिका दाखल करताना वाढलेल्या एआयच्या वापरावर सरन्यायाधीशांनी चिंता व्यक्त केलीय. एआयकडून दिले जाणारे संदर्भ आणि माहिती अचूक असेलच असं नाही. त्यामुळे एआयच्या वापरामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर परिणामाची भीतीही सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.