
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एका महिला याचिकाकर्त्याला तिच्या विभक्त झालेल्या पतीकडून अवास्तव पोटगीची मागणी केल्याबद्दल फटकारले. न्यायालयाने तिला तिच्या उच्च शिक्षणाचा विचार करून स्वतः काम करून उपजीविका चालवण्याचा सल्ला दिला. पतीशी संबंधित वैवाहिक वाद प्रकरणात स्वतःच युक्तिवाद करणाऱ्या या महिलेने मुंबईत एक आलिशान फ्लॅट, १२ कोटी रुपये पोटगी आणि एक हाय-एंड बीएमडब्ल्यू कारची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.