Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

Supreme Court News : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले जावेत, अशा आशयाची जनहित याचिका साबू स्टीफन नावाच्या व्यक्तीने दाखल केली होती.
Supreme Court Refusal to entertain plea seeking ban on dummy candidates from contesting elections
Supreme Court Refusal to entertain plea seeking ban on dummy candidates from contesting elections


नवी दिल्ली : जर एखाद्या व्यक्तीचे नाव लहानपणापासून राहुल गांधी अथवा लालूप्रसाद यादव असे असेल तर अशा व्यक्तीला निवडणूक लढविण्यापासून कसे काय रोखले जाऊ शकते? असा सवाल उपस्थित करीत सर्वोच्च न्यायालयाने डमी नावांच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करण्यासंदर्भातील जनहित याचिकेची दाखल करून घेण्यास नकार दिला.

‘‘जर एखाद्या माणसाने आपल्या मुलाचे नाव राहुल गांधी अथवा लालूप्रसाद यादव असे ठेवले तर त्याला कोण अडवू शकतो,’’ अशी टिपणी न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील
खंडपीठाने सुनावणी दरम्यान केली.

डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले जावेत, अशा आशयाची जनहित याचिका साबू स्टीफन नावाच्या व्यक्तीने दाखल केली होती. निवडणुका प्रभावित करण्यासाठी तसेच मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जाणूनबुजून डमी नावाच्या उमेदवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाते, असा आक्षेप स्टीफन यांनी याचिकेत घेतला होता.

Supreme Court Refusal to entertain plea seeking ban on dummy candidates from contesting elections
Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

समान नावामुळे अनेक मोठ्या नेत्यांना कमी मतांनी पराभव पत्करावा लागला असल्याचे तसेच याबाबतच्या तथ्यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे स्टीफन यांनी याचिकेत म्हटले होते. मात्र तुमची याचिका सुनावणीसाठी योग्य नाही, असे सुनावत खंडपीठाने याचिकेची दाखल घेण्यास नकार दिला.

Supreme Court Refusal to entertain plea seeking ban on dummy candidates from contesting elections
Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com