ayodhya verdict : अयोध्याप्रकरणातील फेरविचार याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

टीम ई-सकाळ
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व फेरविचार याचिका आज, रद्द करण्यात आल्या. या याचिकांमध्ये कोणत्याही प्रकाराचे मेरिट नसल्याचे सांगत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळं अयोध्या प्रकरणात देण्यात आलेला निकाल अंमित ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?
अयोध्या प्रकरणी 9 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता. यात वादग्रस्त जमीन राम मंदिर उभारणीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, मुस्लिम मसाजाला अयोध्येतच पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले होते. या निकालाला आव्हान देणाऱ्या 18 फेरविचार याचिका दाखल झाल्या होत्या. त्यातील 9 याचिका या खटल्यातील पक्षकारांच्याच होत्या तर, 9 नऊ जणांनी या निर्णायावर कोर्टाने फेरविचार करावा, असे म्हटले होते. प्रतिनिधींच्या माध्यमातून लढण्यात येणारा हा खटला होता. त्यामुळं दिवाणी खटल्यांमधील सीपीसीनुसार पक्षकारांसह कोणीही कोणीही पुनर्विचार याचिका दाखल करू शकत होते. या संदर्भात फैजाबाद कोर्टाने 1962मध्ये दिलेल्या एका निकालानुसार नियम आठ अंतर्गत कोणीही नागरिक फेरविचार याचिका दाखल करू शकतो. 

आणखी वाचा - अयोध्येतील घटनाक्रम वाचा सविस्तर

आणखी वाचा - रामाची अयोध्या, घटनापीठाचा एकमुखी निर्णय

कोणत्या खंडपीठाने दिला निकाल?
सरन्यायाधीस एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, अशोक भूषण, जस्टिस एस. अब्दुल नजीर आणि संजीव खन्ना यांच्या पाच सदस्यिय खंडपीठाने फेरविचार याचिकांवर सुनावणी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supreme court rejects all review petitions in Ayodhya case