

Supreme Court of India rejects a petition seeking removal of social media videos featuring Italian leader Giacomo Filibeck raising the 'Vote Chor, Gaddi Chhod' slogan during India Summit 2026 in Hyderabad
esakal
‘वोट चोर, गद्दी छोड़’ या घोषणेशी संबंधित सोशल मीडियावरील व्हिडिओ हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. हैदराबाद येथे आयोजित भारत समिट 2026 दरम्यान युरोपियन सोशलिस्ट पार्टीचे महासचिव जियाकोमो फिलिबेक यांनी ही घोषणा दिली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्यासह संपूर्ण कार्यक्रमाची चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.