सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सरकारी नोकरी मिळाली तर पेन्शन अन् पूर्ण पगार दोन्ही मिळणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Can Retired Government Employees Receive Salary and Pension Together? : सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सरकारी नोकरी स्वीकारल्यास निवृत्तीवेतन आणि नव्या पदाचा पगार कसा मिळणार, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
Supreme Court of India clarifies rules on pension adjustment and salary for retired government employees reappointed to government positions

Supreme Court of India clarifies rules on pension adjustment and salary for retired government employees reappointed to government positions

esakal

Updated on: 

सेवानिवृत्तीनंतर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला पुन्हा सरकारी पदावर नियुक्ती मिळाली, तर त्याला पूर्वीच्या सेवेचे निवृत्तीवेतन आणि नव्या पदाचा पूर्ण पगार असे दोन्ही लाभ मिळू शकतात का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये नव्या पदाचे वेतन निश्चित करताना आधी मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाची रक्कम समायोजित करणे कायदेशीर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, अशा पद्धतीमुळे 'समान कामासाठी समान वेतन' या तत्त्वाचे उल्लंघन होत नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. मात्र, या निर्णयाचा अर्थ निवृत्तीवेतन कायमस्वरूपी बंद केले जाईल, असा होत नाही.

Loading content, please wait...