

नवी दिल्ली: उच्च शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवाराला केवळ कमी शिक्षण असलेल्यांसाठी राखीव ठेवलेल्या नोकरीच्या पदावर नियुक्ती मिळवता येणार नाही, असा स्पष्ट निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. अशा प्रकारे आपली पदवी किंवा उच्च शैक्षणिक अर्हता लपवून पद मिळवणे हे खरोखर पात्र उमेदवारांना संधी नाकारण्यासारखे आहे, असे न्यायालयाने म्हटले.