

Supreme Court
esakal
DPDP Act Student Privacy: देशातील २६ कोटींहून अधिक शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित 'अपार आयडी' योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पालकांना त्यांच्या मुलांचा अपार आयडी बनवायचा आहे की नाही, हे सुरुवातीलाच ठरवण्याचा आणि त्याला स्पष्ट नकार देण्याचा पूर्ण अधिकार असेल, असं कोर्टाने म्हटलंय.