समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, मोठी भूमिका मांडण्याचं नेमकं कारण काय?

Supreme Court on Uniform Civil Code: समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. यामुळे समान नागरी संहिता चर्चेत आला आहे.
Supreme Court on Uniform Civil Code

Supreme Court on Uniform Civil Code

ESakal

Updated on

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम वैयक्तिक कायद्यांतर्गत महिलांच्या हक्कांच्या कथित उल्लंघनांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना देशात समान नागरी संहिता लागू करण्याची बाजू मांडली. न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. ज्यामध्ये म्हटले आहे की, समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. वैयक्तिक कायदे अवैध घोषित करून पोकळी निर्माण करण्याऐवजी समान नागरी संहिता लागू करण्यासाठी ते कायदेमंडळाच्या विवेकबुद्धीवर सोडणे चांगले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com