

“Abusive Words Alone Are Not a Crime”: Supreme Court’s Big Clarification on SC/ST Act Explained
esakal
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ च्या व्याख्येत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देताना, सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्पष्ट केले की, एखाद्या व्यक्तीने अपमानजनक शब्द वापरले तरी ते सरसकट गुन्हा ठरत नाही. यासाठी त्या शब्दांचा उद्देश तक्रारदाराच्या जाती किंवा जमातीच्या सदस्यत्वावर आधारित अपमान करणे हा असावा. हा निकाल न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने गेल्या आठवड्यात दिला.