सर्वोच्च न्यायालयाने मागवली देशातील मागील ७ वर्षांतील श्वानदंशाची आकडेवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोच्च न्यायालयाने मागवली देशातील मागील ७ वर्षांतील श्वानदंशाची आकडेवारी

सर्वोच्च न्यायालयाने मागवली देशातील मागील ७ वर्षांतील श्वानदंशाची आकडेवारी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मोठं पाऊल उचलत मागील सात वर्षांतील देशभरातील श्वानदंशाच्या घटनांबाबत राष्ट्रीय प्राणी कल्याण मंडळाकडे आकडेवारी मागवली आहे. न्यायालयाने बोर्डाला मागील सात वर्षात सर्व राज्यातील प्रमुख शहरांमध्ये श्वानदंशाच्या घटनांचा तपशील देण्यास सांगितले आहे.

याशिवाय प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स ऍक्ट 1960 मध्ये न्यायालयाकडून आणखी मार्गदर्शक तत्त्वे देण्याची गरज आहे का, हेही बोर्ड न्यायालयाला सांगेल. सुप्रीम कोर्टात आता पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये या प्रकरणाची सुनावणी होणार असून बोर्ड आता प्रतिज्ञापत्राद्वारे आकडेवारीसह अहवाल दाखल करणार आहे.

दरम्यान, केरळ सरकारने कुत्र्यांबाबत दाखल केलेल्या याचिकेवर कोणताही आदेश देण्यास न्यायालयाने नकार देत प्रकरण उच्च न्यायालयात पाठवले आहे. केरळमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. केरळमध्ये कुत्र्यांची वाढती दहशत पाहता ही याचिका करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटले की, केरळ Gods own Country ऐवजी Dogs own Country बनले आहे. केरळला देवाचा देश म्हणतात.

केरळला देवाचा देश का म्हणतात?

पौराणिक कथेनुसार, विष्णूचा अवतार असलेल्या भगवान परशुरामांनी आपल्या कुऱ्हाडीने केरळची निर्मिती केली. परशुरामांनी कुऱ्हाड पाण्यात टाकली. यानंतर पाण्यात जमीन तयार झाली. या जमिनीवर केरळ वसल्याची अख्यायिका आहे.