

Former Supreme Court judge Gopal Gowda has called for the cancellation of the SIR decision, alleging that the Election Commission misled the court during proceedings concerning voter list revision
esakal
निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. काँग्रेससह विरोधी पक्ष या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आता, एका माजी न्यायाधीशाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती गोपाल गौडा यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने एसआयआरला मान्यता देणारा आपला निर्णय रद्द करावा. माजी न्यायाधीशांनी दावा केला आहे की, निवडणूक आयोगाने खोटी तथ्ये सांगून न्यायालयाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात बिहारमध्ये एसआयआरची कायदेशीरता कायम ठेवली होती.