
जामीन मिळाल्यानंतरही कैद्याला २८ दिवस तुरुंगात ठेवल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारलं आहे. गाझियाबादच्या तुरुंगातील एका कैदाला जामीन मिळाला होता. पण किरकोळ त्रुटीसाठी कैद्याला २८ दिवस तुरुंगात ठेवलं गेलं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कैद्याला ५ लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि यात जे अधिकारी बेजबाबदारपणे वागले असतील त्यांच्याकडून ही भरपाई वसूल करावी असंही न्यायालयाने म्हटलंय.