
नवी दिल्ली: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त टिपणी करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कठोर शब्दांत फटकारले. ‘मंत्री असूनही तुम्ही कसली भाषा वापरता, कर्नल सोफिया यांची माफी मागा,’ अशा शब्दांत न्यायालयाने शहा यांना सुनावले.