शाळा, कॉलेज सुरू करा; सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांचे म्हणणे 

टीम ई-सकाळ
Monday, 17 August 2020

NEET आणि JEE Main या परीक्षाच रद्द कराव्यात, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. 11 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ही याचिका दाखल केली होती. त्यावर आज, सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निकाल दिला.

नवी दिल्ली : देशात शाळा-कॉलेज-विद्यापीठं सुरू करण्या संदर्भात विचार व्हावा, असे संकेत सुप्रीम कोर्टानं (supreme court) आज दिले आहेत. कोर्टात आज NEET आणि JEE Main या परीक्षांबाबत दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान, कोर्टानं शिक्षणाशी संबंधित सर्व गोष्टी सुरू करायला हव्यात, असं मत व्यक्त केलंय. ही वेळं सुरक्षा साधनं घेऊन पुढं जाण्याची आहे, असं मत कोर्टानं व्यक्त केलंय. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले सुप्रीम कोर्ट? 
NEET आणि JEE Main या परीक्षाच रद्द कराव्यात, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. 11 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ही याचिका दाखल केली होती. त्यावर आज, सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने निकाल दिला. हा निकाल देताना, याचिकाच फेटाळून लावल्या. न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी आपलं परखड मत व्यक्त करताना म्हटलंय की, कोरोनाचा धोका आहे म्हणून, देशात आता सगळचं थांबवायचं का? एक मौल्यवान वर्ष असेच वाया जाऊ द्यायचे का? ही वेळ सुरक्षेचे उपाय-साधनं घेऊन पुढं जाण्याची आहे. कोर्टात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीनेही बाजू मांडण्यात आली. त्यात एजन्सीचे वकील तुषार मेहता म्हणाले, 'सुरक्षेच्या उपाय-योजनांसह परीक्षा घेण्याची परवानगी दिली पाहिजे.' कोरोनाचा धोका आणखी एक वर्षे चालूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता शिक्षणाशी निगडीत सर्व गोष्टी सुरू करायला हव्यात, असं मत न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी व्यक्त केलंय. 

आणखी वाचा - JEE, NEET परीक्षा होणारच; सुप्रीम कोर्टाचा निकाल

कधी होणार परीक्षा?
कोर्टाने निकाल दिल्यामुळं यंदा दोन्ही परीक्षा होण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यात JEE Main परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान, होण्याची शक्यता आहे. तर, NEET परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. कोर्टाच्या आजच्या निकालामुळं परीक्षांबाबतची अनिश्चितता दूर झाली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supreme court statement on education during coronavirus lock down