
मुंबईत लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सर्व १२ आरोपींना निर्दोष सोडलं होतं. या निर्णयाला राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी करताना निर्णयाला स्थगिती दिली आहे. दरम्यान, निर्दोष सुटका झालेल्यांना सध्या अटक केली जाणार नाही किंवा त्यांना पोलिसात हजर होण्याची आवश्यकता नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.