Supreme Court Stray Dogs : दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे श्वानप्रेमी वर्गात नाराजीची लाट उसळली होती. या आदेशाविरोधात काही जणांनी दिल्लीमध्ये आंदोलन केलं, ज्यादरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आदेशानुसार, आठ आठवड्यांच्या आत दिल्लीतील सर्व भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात हलवण्याचे निर्देश देण्यात आले होते.