
Supreme Court
sakal
नवी दिल्ली : ‘‘काडीकचरा जाळणाऱ्या काही शेतकऱ्यांना तुरुंगात टाकले तर इतरांना धडा मिळेल,’’ अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून करण्यात आली. काडीकचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई का केली जात नाही? अशी विचारणा सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने पंजाब सरकारसह इतर पक्षकारांना केली.