Supreme Court to Rahul Gandhi: शिक्षेला स्थगिती दिली पण कोर्टाने राहुल गांधींचे कान देखील टोचले

Supreme Court to Rahul Gandhi
Supreme Court to Rahul Gandhi
Updated on

Supreme Court to Rahul Gandhi: मोदी आडनाव मानहानी प्रकरणात काँग्रेसनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. यासोबत न्यायालयाने राहुल गांधी यांचे कान देखील टोचले आहेत.

न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली पण एका नेत्याने बोलताना समजूतदारपणा दाखवायला हवा, असे म्हटले आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

राहुल गांधी यांना २३ मार्च रोजी सुरत न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी देखील गेली होती. दरम्यान न्यायालयाने त्यांच्या शिक्षेवर स्थगिती दिली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की, सार्वजनिक जीवनात जगणाऱ्या व्यक्तीने भाषण करताना काळजी घ्यावी. तसेच सावधगिरी बाळगली पाहिजे. Supreme Court to Rahul Gandhi

काय म्हणाले होते राहुल गांधी?

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी कर्नाटकातील कोलार येथे एका सभेला संबोधित करत होते. त्यानंतर त्यांनी नीरव मोदी, ललित मोदी यांचा उल्लेख करत 'मोदी आडनाव'वर टिप्पणी केली. त्यानंतर भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. (latest marathi news)

Supreme Court to Rahul Gandhi
Sharad Pawar: शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केलेल्या 'त्या' तरुणाला भाजपच्या मीडिया सेलची जबाबदारी

राहुल गांधी आता संसदेत सहभागी होऊ शकतील. त्यांना सदस्यत्व बहाल केले जाईल. ही शिक्षा थांबवली नसती, तर राहुल गांधी खासदार म्हणून अपात्र ठरले असते आणि पुढची ८ वर्षे त्यांना निवडणूक लढवता आली नसती अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राहुल गांधी, काँग्रेस आणि नुकत्याच स्थापन झालेल्या संपूर्ण INDIA विरोधी आघाडीसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

Supreme Court to Rahul Gandhi
Indapur News: इंदापूरमधील विहिर दुर्घटनेतील चारही मृतेदह सापडले; तब्बल ६८ तासांनी शोधकार्य संपलं, मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com