Sharad Pawar: शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केलेल्या 'त्या' तरुणाला भाजपच्या मीडिया सेलची जबाबदारी

शरद पवार यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती, त्यामुळे तो 50 दिवस तुरुंगात होता
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

NCP Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निखिल भामरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच कारण म्हणजे निखिल भामरेच्या खांद्यावर आता भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. निखिल भामरे याची भाजपच्या मीडिया सेलच्या सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निखिल भामरे हा नाशिकच्या सटाणा तालुक्यातील आहे. त्याने गेल्यावर्षी शरद पवार यांच्याविषयी मोठं वादग्रस्त ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये लिहिलं होतं, "वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग."

या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. निखिल भामरे याच्यावर राज्यभरात ७ वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही करण्यात आली होती. यानंतर निखिल भामरे ५० दिवस तुरुंगात होता.

Sharad Pawar
Ram Shinde VS Rohit Pawar: अदानींची गाडी जामखेडला का वळली नाही? भाजपच्या राम शिंदेंचा रोहित पवारांना सवाल

याच निखिल भामरेला भाजपकडून मीडिया सेलचे सहसंयोजक पद देण्यात आलं आहे. या प्रकरणाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टीका करणाऱ्या निखिल भामरेला अधिकृत पद दिल्याने पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

निखील भामरेच्या नियुक्तीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण ज्यावेळी निखीलने शरद पवारांवर पोस्ट केली होती. तेव्हा त्याचा संबंध भाजपाशी जोडण्यात आला होता. मात्र भाजपाने आणि निखीलने त्यावेळी त्या गोष्टीचा नाकारले होते.

Sharad Pawar
Rohit Pawar: रोहित पवार करणार राम शिंदेंचा शाल देऊन सत्कार, MIDC ठरतंय कारण

निखील भामरेच्या नियुक्तीवर रोहित पवारांची प्रतिक्रीया

'सोशल मिडियात मा. पवार साहेबांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे याची भाजपकडून सोशल मिडियाचा सहसंयोजक म्हणून नेमणूक केली जाते, म्हणजेच समाजात विकृतीला खतपाणी घालण्याचं काम भाजपच करत असल्याचं स्पष्ट झालंय. समाजात विष कालवणाऱ्या या विकृत कृतीचा तीव्र निषेध! भाजपच्या आणि त्यांच्या #मित्र_पक्षाच्या किती नेत्यांकडून या कृतीला विरोध होतो, हेच आता बघायचंय..', असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.

Sharad Pawar
Devendra Fadanvis News : 'आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नाही', फडणवीसांनी सभागृहात दिली घटनेबाबत महत्त्वाची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com