वृत्तवाहिन्यांवरील 'डिबेट शो' द्वेष पसरवण्याचं सर्वात मोठ कारण; SC कडून कानउघडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme Court

वृत्त वाहिन्यांवरील 'डिबेट शो' द्वेष पसरवण्याचं सर्वात मोठं कारण; SC कडून कानउघडणी

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने बुधवारी टीव्ही वृत्तवाहिन्यांवरील डिबेट शो हे द्वेष पसरवण्याचे सर्वात मोठे माध्यम असल्याचं निरीक्षण नोंदवलं. टीव्ही चॅनेल्सच्या चर्चेच्या मजकुरावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Supreme Court news in Marathi)

हेही वाचा: मद्रास HC : महिला स्वइच्छेने वेगळी झाल्यास 'नंतर' पोटगीसाठी दावा करू शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाने याबाबत केंद्र सरकारला जाब विचारला आहे. तसेच सरकार हे सर्व मूकदर्शन म्हणून पाहत असून याला छोटी गोष्टी समजत असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि हृषिकेश राय यांच्या खंडपीठाने टीव्ही चर्चेचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचा आपला इरादा बोलून दाखवला आहे. तसेच केंद्र सरकार या विषयावर काही कायदा आणणार आहे का, अशी विचारणा केली.

हेही वाचा: Acharya Pramod: "गांधी घराणं CM काय PM ही बनवेल, आता पक्ष मजबूत करण्याची वेळ"

दरम्यान द्वेषातून टीआरपी येतो आणि टीआरपीमधून नफा येतो' याकडे खंडपीठाने लक्ष वेधलं. तसेच यासंदर्भात मार्गदर्शक तत्व जारी करायचे संकेत न्यायालयाने दिले आहे, तसेच जोपर्यंत सरकार या संदर्भात कायदा करत नाही तोपर्यंत मार्गदर्शक तत्वांचा वापर करण्यात यावा, असंही स्पष्ट केलं आहे.

Web Title: Supreme Court Tv Channels Chief Medium Of Hate Speech

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Supreme Courtmedia