

CJI Suryakant
esakal
सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंडमधील संरक्षित वनजमिनीवर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाची गंभीर दखल घेतली आहे. सोमवारी, २२ डिसेंबर रोजी खंडपीठासमोर हे प्रकरण आले. मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या पीठाने स्वतःहून या विषयावर जनहित याचिका दाखल करून खटला सुरू केला.