New Delhi : शैक्षणिक गोष्टींत हस्तक्षेप करू नका; बार कौन्सिलला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात हस्तक्षेप का करीत आहात. विधी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम व अन्य गोष्टींबाबत ‘बीसीआय’ का निर्णय घेत आहे. या गोष्टींची जबाबदारी एखाद्या शिक्षणतज्ज्ञाने घ्यायला हवी.
Supreme Court warns Bar Council to stay away from academic interference in legal education matters.Sakal
नवी दिल्ली : विधी महाविद्यालयांच्या शैक्षणिक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने बार कौन्सिल ऑफ इंडियाला (बीसीआय) मंगळवारी फटकारले आणि हे काम शिक्षणतज्ज्ञांवर सोपवले पाहिजे, असे मंगळवारी नमूद केले.