
नवी दिल्लीः दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये कथितपणे कॅश आढळून आली होती. घराला आग लागल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना ही कॅश आढळूल आल्याचं सांगितलं गेलं. या प्रकरणाची चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने तीन सदस्यीच चौकशी समिती गठीत केली आहे.