
Supreme Court judgment on a marital dispute
esakal
सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक वादाच्या एका प्रकरणात महत्त्वाचा निर्णय देताना पती-पत्नीच्या नातेसंबंधांवर आणि मुलांच्या कल्याणावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले की, पत्नीने पतीला भोवऱ्यासारखे इकडे-तिकडे फिरवण्याचा प्रयत्न करू नये. तसेच, जोडप्याने आपला अहंकार बाजूला ठेवून मुलांच्या भविष्यासाठी एकत्र राहण्याचा विचार करावा, असेही न्यायालयाने सुचवले.