supriya sule
supriya sule

सुप्रिया सुळेंकडून मोदींच्या भाषणाचा पर्दाफाश, गोयल यांचं पत्रचं समोर आणलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिलं, यावेळी त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच कोविड काळात काँग्रेस चुकीच्या पद्धतीनं वागल्याचंही नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले. महाराष्ट्रातील मजूर बाकीच्या राज्यांमध्ये गेल्याने कोरोना वाढला असं ते म्हणाले. हे काँग्रेसच्या सरकारने केल्याने कोरोनाला हातभार लागल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. महाराष्ट्रातील काँग्रेसने ऐन कोरोना काळात श्रमिक ट्रेन्स पाठवल्या आणि सुपर स्प्रेड वाढला अशी टीका मोदी यांनी केली. (Supriya Sule alleges PM Modi over Shramik Train)

त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. त्यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि अन्य काही मंत्र्यांचा संदर्भ दिला. तसेच मंत्र्यांचं पत्रचं समोर ठेवून मोदींच्या वक्तव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी फडणवीसांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना पाठवलेल्या पत्राचाही संदर्भ दिला.

श्रमिक ट्रेन्स केंद्राने सोडल्या...सुप्रिया सुळेंकडून डेटा!

देशातील सर्वाधिक ट्रेन्स या राज्यांतून गेल्याची माहिती सुळे यांनी दिली. त्यांनी रेल्वे मंत्रालयाचा डेटा माध्यमांसमोर ठेवला. यामध्ये सर्वाधिक श्रमिक ट्रेन्स गुजरातमधून गेल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

महाराष्ट्रातून ८१७ ट्रेन्स

गुजरातमधून १0३३ ट्रेन्स

पंजाब ४३० ट्रेन्स

supriya sule
प्रधानमंत्रीजी आपसे नाराज नहीं, हैरान हूँ मैं : सुप्रिया सुळे

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

  • का मोदी महाराष्ट्राबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत

  • मोदींच्या वक्तव्याला शास्त्रीय आधार नाही

  • कोरोना कुणी पसरवला याचं आत्मचिंतन व्हावं

  • पंतप्रधानांचं भाषण आम्ही अपेक्षेने पाहात होतो. मला प्रचंड वेदना झाल्या.

  • ज्या राज्याने भाजपला १८ खासदार दिले. त्या महाराष्ट्राने फूल ना फुलाची पाकळी दिली. त्याबद्दल मोदी असं कसं म्हणू शकले?

  • पंतप्रधान एका पक्षाच्या वतीने बोलतात हे पाहून मला दुख होतं.

  • पंतप्रधान देशाचे असतात. मात्र हे महाराष्ट्राचं योगदान विसरतात

  • एकदा निवडून आल्यावर ते पक्षाचे प्रधानमंत्री नसतात ते देशाचे प्रधानमंत्री असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com