सुप्रिया सुळेंनी दाखवलेल्या चुकीवर अमित शहा म्हणतात 'कबूल'

वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

शेवटच्या क्षणी अमित शहांकडून थोडीशी चूक झाली. खासदार सुप्रिया सुळेंनी ही चूक शहांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर, शहांनीही चूक कबुल असल्याचं सांगत ती दूरुस्त केल्याचंही स्पष्टीकरण दिलं.
 

नवी दिल्ली : संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडत असताना गृहमंत्री अमित शहा यांच्याडून एक चूक झाली होती, जी चूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लक्षात आणून दिली. गृहमंत्री अमित शहांनी विधेयकातील विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली. यावेळी, शेवटच्या क्षणी अमित शहांकडून थोडीशी चूक झाली. खासदार सुप्रिया सुळेंनी ही चूक शहांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर, शहांनीही चूक कबुल असल्याचं सांगत ती दूरुस्त केल्याचंही स्पष्टीकरण दिलं.

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

अमित शाह म्हणाले की, लोकसभेत या विधेयकावर धर्माच्या मुद्द्यावरुन कोणाचाही आक्षेप नाही. मात्र, सुप्रिया सुळेंनी अमित शहांच्या या वाक्याला कोट करत धर्माच्या मुद्द्याला आमचा आक्षेप आहे, आम्हीही लोकसभेतील सदस्य आहोत, असे म्हणत अमित शहांची चूक लक्षात आणून दिली. सुप्रिया सुळेंच्या भाषणानंतर अमित शहा यांनी आपली चूक कबुल केली. तसेच, सदरची चूक लक्षात आणून देत या प्रस्तावातील भाषणात मी बदल केल्याचंही अमित शहांनी लोकसभेत विधेयकावरील चर्चेवेळी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे 2016 रोजी लोकसभेत सादर करण्यात आले होते. पण, तेव्हा लोकसभेत ते मंजूर होऊ शकले नाही. त्यानंतर हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीपुढे मांडण्यात आले. संयुक्त संसदीय समितीमध्ये अमित शहा बोलत होते त्यावेळी ही घटना घडली. देशात सध्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाचाची चर्चा होत असून गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत हे विधेयक मांडले. सोमवारी उशिरा लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 311 तर विरोधात 80 सदस्यांनी मतदान केले. 

पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

विधेयकाला काँग्रेसने कडाडून विरोध करण्यात आला आहे. त्यावेळी अमित शहांनी तब्बल 6 ते 7 तास या विधेयकावर चर्चा केली. विधेयकास काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला आहे. तसेच, शिवसेनेनं लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला होता, मात्र राज्यसभेत शिवसेनेनं आपली भूमिका बदलली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya Sule requests Amit Shah to withdraw Citizenship Bill