Crime News : धुळ्याच्या विनोदचे सुरतमध्ये मोठे कांड ! १० हजारांच्या थकीत पगारासाठी मार्केटला लावली आग, १७ दुकाने भस्मसात,२४ कोटींचे नुकसान

Vinod Savle Arrested : थकीत १० हजार रुपये वेतन आणि नोकरीदरम्यान झालेल्या कथित अपमानाच्या रागातून त्याने आग लावल्याचे चौकशीत सांगितल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आगीत चार व्यापाऱ्यांची १७ दुकाने जळून खाक झाली असून २४ कोटींचे नुकसान झाले.
CCTV and Location Tracking Led Police to Accused

CCTV and Location Tracking Led Police to Accused

esakal

Updated on

Surat Textile Market Fire : सुरतच्या सारोली परिसरातील ‘श्याम संगिनी टेक्स्टाइल मार्केट’मध्ये ९ सप्टेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीमागचे गूढ अखेर उकलल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका माजी मुनिमाला अटक केली असून, थकीत वेतन आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने आग लावल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. या आगीत तब्बल २४ कोटी रुपयांचा कापडाचा साठा जळून खाक झाला असून, चार मोठ्या व्यापाऱ्यांची १७ दुकाने आगीत भस्मसात झाली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com