रिअल इस्टेटला धक्का; नामवंत बिल्डरची गळफास घेऊन आत्महत्या

वृत्तसंस्था
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

काय घडले?
रवानी यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींमुळे हरिश दबावाखाली होती. त्यांची मनस्थिती ठिक नसल्यामुळे त्यांच्यावर उपचारही सुरू होते. हरिश यांचे धाकटे भाऊ विनोद यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश सोमवारी सकाळी कन्सट्रक्शन साईटवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. पण, साईटवरील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते तेथून लगेचच निघून गेले.

सूरत : देशातील बांधकाम उद्योग गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत आला आहे. मोठ मोठे बांधकाम व्यवसायिक आर्थिक अचडणीत आले आहेत. या परिस्थितीचा पहिला मोठा बळी गुजरातमध्ये गेला असून, सुरतमधील एका नामवंत बिल्डरने कर्जांच्या चिंतेमुळे त्याच्या फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडली आहे. देशातील बांधकाम उद्योगाला विशेषतः गुजरातमधील बांधकाम उद्योगाला हा सर्वांत मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. 

काय होत्या अडचणी?
हरिश सावजी रवानी (वय ४६) यांनी सोमवारी कामरेज येथील आपल्या फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केली. हरिश यांनी रवानी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सूरतमधील नामवंत बांधकाम कंपनी आहे. शहरातील पहिल्या पाच नामवंत कंपन्यांमध्ये या कंपनीचा समावेश होतो. सूरतमधील अनेक उच्चभ्रू वस्तीतील बांधकामे तसेच व्यवसायिक इमारती उभारण्यात हरिश रवानी यांचा मोठा वाटा होता. रवानी यांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळे सध्या सूरतमधील बांधकाम व्यवसायिकांना मोठा धक्का बसला आहे. रवानी कंपनीवर असलेल्या कर्जाची चिंता हरिश यांना सतावत होती, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली. 
'एसबीआय'मध्ये पैसे भरणे महागणार !

काय घडले?
रवानी यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींमुळे हरिश दबावाखाली होती. त्यांची मनस्थिती ठिक नसल्यामुळे त्यांच्यावर उपचारही सुरू होते. हरिश यांचे धाकटे भाऊ विनोद यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश सोमवारी सकाळी कन्सट्रक्शन साईटवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. पण, साईटवरील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते तेथून लगेचच निघून गेले. दुपारी चारच्या सुमारास त्यांना डॉक्टरांकडे जायचे होते. त्याची आठवण करून देण्यासाठी विनोद त्यांना सतत फोन करत होते. पण, संपर्क होत नव्हता. त्यानंतर हरिश फार्म हाऊसवर येऊन झोपल्याची माहिती मिळाली. त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी फार्म हाऊसकडे जात असतानाच तेथील कर्मचाऱ्यांनी हरिश यांनी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. फार्म हाऊसवर लोकांनी मोठी गर्दी केली होती. हरिश यांच्या मागे पत्नी रेखा, उत्सव आणि दर्शित, अशी दोन मुले आहेत.
iPhone11 : ट्रिपल कॅमेऱ्यासह 'आयफोन 11' लाँच; किंमत आवाक्यात 

नोटाबंदीचा फटका बांधकाम उद्योगाला
केंद्र सरकारच्या नोटाबंदीचा सर्वांत मोठा फटका बांधकाम उद्योगाला बसला आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या बांधकाम क्षेत्रावर जीएसटी आणि रेरा कायद्याची नियमावलीमुळे आणखी संकट ओढवले. सध्या देशभरातील बांधकाम क्षेत्रात मोठी मंदी दिसत आहेत. अनेकांनी बांधकाम प्रकल्प थांबवले आहेत. तर अनेक व्यावसायिकांच्या सदनिका, पडून आहेत. सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रातही मंदी आली आहे. पण, बांधकाम क्षेत्रात एखाद्या मोठ्या बिल्डरने आत्महत्या करण्याची ही पहिलीच वेळ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Surats top most builder hangs to death