Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

Nithari Case : निठारी प्रकरणातील आरोपी सुरेंद्र कोलीची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर हरिद्वारमध्ये जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. हरिद्वारमधील चहाच्या टपरीवर कोलीचा मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
Who Was Surendra Koli?

Who Was Surendra Koli?

esakal

Updated on

Surendra Koli Spent 21 Years in Prison : देशभरात चर्चेत असलेल्या निठारी प्रकरणातील आरोपी सुरेंद्र कोलीची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर काही महिन्यांतच हरिद्वारमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हरिद्वारमधील एका चहाच्या टपरीवर त्याचा मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. कोलीने हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com