सुरेश वाडकर, सुहास जोशी संगीत नाटक अकादमीचे मानकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 16 July 2019

नवी दिल्ली : कलाक्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणाऱ्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2018 ची घोषणा आज दिल्लीत करण्यात आली. 

यांमध्ये प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या मराठी नावांचा समावेश आहे. तबला नवाज झाकीर हुसेन व प्रसिद्ध नृत्य कलाकार आणि खासदार सोनल मानसिंग यांच्यासह चौघांना संगीत नाटक अकादमीची अकादमीरत्न ही फेलोशिप जाहीर झाली आहे.

संगीत नाटक अकादमीतर्फे 40 पुरस्कार विजेते आणि चार फेलो यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. मध्ये शास्त्रीय गायक मधुप मुद्गल, यक्षगान कलाकार भागवत ए एस नंजप्पा, ओडिसी नृत्य कलाकार स्वपन नंदी आदींचा समावेश आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते लवकरच पुरस्कार वितरण होणार आहे.
52 पासून देण्यात येणाऱ्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचे स्वरूप लाख रुपये, ताम्रपत्र आणि शाल असे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suresh wadkar suhas joshi awarded by sangit natya akadami