बंगळूर : तीन किलोमीटर धावत जाऊन केली शस्त्रक्रिया

डॉक्टरची निष्ठा; वाहतूक कोंडीमुळे वाहन दिले सोडून
Surgery performed by doctor running three kilometers Bangalore
Surgery performed by doctor running three kilometers Bangaloresakal
Updated on

बंगळूर : शहर कोणतेही असो वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली आहे. या वाहतूक कोंडींचा रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना फटका बसतो. कार्यालयात जाणारे कर्मचारी देखील कोंडीमुळे वेळेत पोचू शकत नाही. परंतु काही जण आकाशपाताळ एक करत कामावर वेळेवर जाण्याबाबत आग्रही असतात. असाच अनुभव बंगळूरच्या नागरिकांना आला. नियोजित शस्त्रक्रिया ठरलेल्या वेळेतच व्हावी यासाठी येथील एका डॉक्टरने वाहतूक कोंडीत अडकलेले वाहून सोडून तीन किलोमीटरचे अंतर पंधरा मिनिटे पार करत रुग्णालय गाठले आणि शस्त्रक्रिया केली. शल्यचिकित्सक डॉ. गोविंद नंदकुमार असे त्यांचे नाव असून त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

३० ऑगस्टला गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सर्जन डॉ. गोविंद नंदकुमार हे आपत्कालीन पित्ताशयावरील लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसाठी बंगळूरच्या सर्जापूर रोड येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये जात असताना हा प्रकार घडला. डॉ. नंदकुमार म्हणाले, गुगल मॅपने रुग्णालयात जाण्यासाठी ४५ मिनिटे वेळ दाखवला. साधारणपणे रुग्णालयात त्या मार्गाने पोचण्यासाठी ५ ते १० मिनिटे लागतात. त्यामुळे आपण वाहन सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि मी धावत १५ मिनिटात तीन किलोमीटरचे अंतर पार करत रुग्णालय गाठले. विशेष म्हणजे त्यांच्या वाहन चालकाला रुग्णालयात येण्यासाठी अडीच तास लागले. नंदकुमार यांनी गेल्या १८ वर्षांत एक हजाराहून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. सुबोध कुमार, रंजन राय यांनी त्यांच्या सोशल मीडियावर डॉक्टरांचे ‘अनसंग हीरो’ म्हणून कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com