सर्जिकल स्ट्राईकचे 'हिरो' लेफ्टनंट जनरल हुडा काँग्रेसच्या गोटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्जिकल स्ट्राईकचे 'हिरो' लेफ्टनंट जनरल हुडा काँग्रेसच्या गोटात

लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाली असून राहुल गांधीनी भाजपवर एकप्रकारे सर्जिकल स्ट्राईक केला आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो लेफ्टनंट जनरल हुडा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

सर्जिकल स्ट्राईकचे 'हिरो' लेफ्टनंट जनरल हुडा काँग्रेसच्या गोटात

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झाली असून राहुल गांधीनी भाजपवर एकप्रकारे मोठा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे हिरो लेफ्टनंट जनरल हुडा हे काँग्रेसच्या गोटात दाखल झाले आहेत. 
 


आगामी लोकसभा निवडणुकापूर्वी काँग्रेस पक्षाने मोठा डाव टाकत सर्जिकल स्ट्राईकचे हिरो लेफ्टनंट जनरल हुडा यांना आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय सुरक्षा टास्क फोर्स तयार करून त्याची पूर्ण जिम्मेदारी ही हुडा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याची माहिती काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरून देण्यात आली आहे.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना केल्याची माहिती काँग्रेस पक्षानं दिली. 'काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी एका कृती दलाची स्थापना करण्यासाठी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. एस. हुडा यांची भेट घेतली. हुडा देशासाठी एक कृती आराखडा तयार करतील,' असं काँग्रेसनं ट्विटमध्ये म्हटलं. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी अवघ्या काही आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेसनं सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर एक समिती स्थापन केली आहे. काँग्रेसचं हे पाऊल महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. त्याचबरोबर हा भाजपसाठीही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील उरीमध्ये 18 सप्टेंबर 2016 रोजी चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये भारतीय लष्कराच्या 19 जवानांना वीरमरण आलं. यानंतर दहा दिवसांनी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राइक केला. या कारवाईत जवानांनी दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. या कारवाईचा फार गाजावाजा करण्याची आवश्यकता नव्हती, असं मत हुडा यांनी व्यक्त केलं होतं.