esakal | सुशांत सिंह राजपूत प्रकरण : सुप्रीम कोर्टात कोण काय म्हणाले?
sakal

बोलून बातमी शोधा

sushant singh case

सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षकारांना येत्या गुरुवारपर्यंत बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ दिला आहे. त्यामुळं यावर आता गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरण : सुप्रीम कोर्टात कोण काय म्हणाले?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput news) मृत्यू प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात (Supreme Corut) सुनावणी झाली. सुशांत राजपूतच्या आत्महत्येप्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या रिया चक्रवर्तीने पाटणामध्ये दाखल प्राथमिक तक्रार मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) वर्ग करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षकारांना येत्या गुरुवारपर्यंत बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ दिला आहे. त्यामुळं यावर आता गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

sushant singh rajput Case Updates :सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सुप्रीम कोर्टात पुन्हा होणार सुनावणी
 

#पाटण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा अधिकृत आहे, असा युक्तीवाद करत बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडली. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीमागे बिहारमधील विधानसभा निवडणुकांचा संबंध आहे, असा आरोप त्यांनी युक्तीवादा करत असताना केला.    

#या प्रकरणातील तपास हा बिहार पोलिसांकडे  नको, अशी मागणी  सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने न्यायालयाकडे केली. वकील श्याम दीवान यांनी कोर्टात रियाची बाजू मांडली. रियाला न्याय देण्यासाठी तपास हा मुंबईकडे वर्ग करायला हवा. या घटनेचा बिहारशी संबंध नाही. ही गोष्ट त्यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. 

#सुशांत सिंहच्या वडिलांच्या वतीने वकील विकाससिंह मांडत आहेत. सुशांतने गळफास घेतला. कुटुंबिय येण्यापूर्वीच मृतदेह खाली का उतरवला? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला.

#तपास  रोखण्यासाठीच बिहरामधील पोलिस अधिकाऱ्याला क्वारंटाईन करण्यात आलं, असे बिहार पोलिसांकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. मुंबईतील चौकशी पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

#न्यायाधीश ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने रियाचे वकिलांना याचिकेत सीबीआय चौकशीच्या मागणीसंदर्भातील भूमिका काय असा प्रश्न विचारला. यावर वकील श्याम दिवान यांनी निष्पक्ष तपास व्हायला हवा, असे म्हटले.  

#बिहार सरकारचे वकील मनिंदर सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल न करता 56 लोकांची साक्ष नोंदवली. गुन्हा दाखल न करता तपास सुरु असल्यामुळे बिहार पोलिसांना यात लक्ष्य घालावे लागले. 

लाल किल्ल्याभोवती कोरोना सुरक्षा कवच