esakal | 'सीबीआय तपासानंतर सत्य बाहेर येईल', सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर कोण काय म्हणाले?
sakal

बोलून बातमी शोधा

sushant singh case

बिहारचा नव्हे तर न्यायाचा विजय!

'सीबीआय तपासानंतर सत्य बाहेर येईल', सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर कोण काय म्हणाले?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (supreme court) CBI ला तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर समाजमाध्यमावर समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये बऱ्याच लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसेच काही जणांनी मुंबई पोलिसांनी (mumbai police) केलेल्या तपासावर संशय व्यक्त केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना CBI ला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आतापर्यंत गोळा केलेले सर्व पुरावे CBI ला  देण्याचे आदेशही  सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. 

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे : सर्वोच्च न्यायालय

आता या प्रकरणावर विविध क्षेत्रांतन  प्रतिक्रिया येत आहेत. सुप्रीम कोर्टाने CBI कडे दिलेल्या या तपासामूळे सत्य बाहेर येईल, असा विश्वास बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केलाय. सुब्रमण्यम स्वामी यांनी (subramanian swamy) ' CBI जय हो' अशी प्रतिक्रिया दिली आहे. अंकिता लोखंड हिने देखील सत्याचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.  

चिराग पासवान- (chirag paswan)

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. सीबीआयकडे चौकशी करण्याची प्रत्येकाची मागणी होती. आता दिलेला सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीसाठी निर्णय दिला आहे सुशांत सिंह राजपूत यांच्या कोट्यावधी  चाहत्यांचा विजय आहे. माझा विश्वास आहे आता सीबीआय लवकरच सर्व बाबींवर काम करणार आहे.

‘अब बेबी पेंग्वीन तो गयो, इट्स शो टाईम’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती राणेंची प्रतिक्रिया 

अनुपम खेर-  जय हो.. जय हो.. जय हो

महाराष्ट्रातील राजकारणातूनही यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते! असे ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटमुळे राजकीय चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. 

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देखील सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेकडे कोण कोणत्या प्रकारे पाहते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असे म्हणत सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळायला हवा, असे ते म्हणाले आहेत. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासाच्या मुद्यावरुन महाराष्ट्र विरु्द्ध बिहार सरकार असा संघर्ष सुरु झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. हा बिहारचा नव्हे तर न्यायाचा विजय, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोर्टाच्या आदेशाची कॉपी प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रिया देऊ, असे सांगितले आहे.