सुषमा स्वराज यांचा जन्मदिन; पती कौशल यांनी अशी काढली आठवण... 

वृत्तसंस्था
Friday, 14 February 2020

प्रवासी भारतीय केंद्राचे नामकरण

- परराष्ट्रमंत्र्यांचेही ट्विट

नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांचा आज (ता.14) जन्मदिन आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आठवणीत सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी, 1952 अंबाला छावणी येथे झाला. स्वराज कौशल यांनी ट्विट करत सांगितले, की हॅपी बर्थडे सुषमा स्वराज...आमच्या जीवनातील आनंद. 

प्रवासी भारतीय केंद्राचे नामकरण

भारतीय समुदाय संपर्काचे प्रमुख सांस्कृतिक केंद्र 'प्रवासी भारतीय केंद्र'चे नामकरण 'सुषमा स्वराज भवन' करण्याचा निर्णय घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी याबाबतची माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. 

परराष्ट्रमंत्र्यांचेही ट्विट

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करत सांगितले, की सुषमा स्वराज या आमच्या कायम स्मरणात राहतील. 14 फेब्रुवारीला 68 वा जन्मदिन आहे. त्यांची कमी परराष्ट्र मंत्रालयात नेहमीच जाणवणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushma Swaraj Birthday Her husband swaraj kaushal Share Photo of Sushma