सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीत निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नवी दिल्ली : भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे आज रात्री नऊ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र स्वराज यांचे रात्री साडेदहाच्या सुमारास दुःखद निधन झाले.

नवी दिल्ली : भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे आज रात्री नऊ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र स्वराज यांचे रात्री साडेदहाच्या सुमारास दुःखद निधन झाले.

अडीच वर्षांपूर्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याने स्वराज यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या मात्र त्यानंतरही त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री पदाची सूत्रे धडाडीने हलविली होती. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, सर्वात कमी म्हणजे केवळ 25 व्या वर्षी वयात हरियाणासारख्या राज्याच्या मंत्रिपदी विराजमान झालेल्या राजकीय नेत्या, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी या दोन्ही भाजप सरकार यांच्या काळात मंत्रिपदी भूषवणाऱ्या त्या माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज यांना आज संध्याकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना रात्री दहाच्या सुमाराला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

किडनी निकामी झाल्यामुळे स्वराज यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी तातडीने निवासस्थानही सोडले. आज रात्री स्वराज यांना गंभीर अवस्थेत हल्ला केल्यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी धाव घेतली.

दरम्यान, जंतर-मंतर परिसरातील आपल्या घरी त्या होत्या. मात्र, राजकीय दृष्ट्या त्यांनी अतिशय तल्लख प्रतिक्रिया नोंदवणे सुरू ठेवले होते. जम्मू आणि काश्मीर चे 370 वे कलम रद्द करण्याचे विधेयक नरेंद्र मोदी सरकारने काल राज्यसभेत मंजूर केल्यावर स्वराज यांनी तातडीने ट्विट करत सरकारचे विशेषतः गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाचे कौतुक केले होते. त्यांचे ते शब्द होते की, ” हा क्षण पाहण्यासाठीच मी जिवंत आहे...” त्यांचे हे शब्द जणू विधात्यानेच खरे केले आणि लोकसभेत जम्मू-काश्मीर मंजूर झाल्यावर काही तासातच स्वराज यांनी इहलोकाचा निरोप घेतला.

स्वराज यांच्या निधनाचे वृत्त समजताच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, गडकरी आदी नेत्यांची रीघ एम्स कडे लागली. प्रभू श्रीकृष्णाच्या अतिशय निस्सीम भक्त असलेल्या यांची कारकीर्द वादळी राहिली. हरियाणा चा मंत्री दिल्लीत केंद्र सरकारच्या मंत्री दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि मोदी सरकार मध्ये परराष्ट्रमंत्री सांगाल मी त्यांनी जेथे जातील तेथे आपल्या कामाची छाप सोडली. विशेषतः 2014 मध्ये परराष्ट्र मंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर स्वराज यांनी एकतेसाठी जी कामगिरी केली तसेच राष्ट्रसंघात पाकिस्तानचा बुरखा टरका होणारी जी भाषणे केली त्यामुळे त्यांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पद संस्मरणीय ठरले.

परदेशात अडकलेल्या हजारो नागरिकांना स्वराज यांनी एका ट्विटर संदेशावर तातडीने कारवाई करत मुक्त केले हिचं ची कामगिरी भारतीय इतिहासात कायमस्वरूपी स्मरणात राहणारी ठरणार आहे. स्वराज यांनी सक्रिय निवडणूक राजकारणातून निवृत्ती पत्करली तरी राजकारणातून निवृत्ती पत्करलेली नाही असे सकाळच्या प्रतिनिधीला नुकतेच सांगितले होते. विदेश मंत्रालय तर्फे दरवर्षी जानेवारीत होणाऱ्या विशेष भात वेळात वेळ काढून त्यांनी सकाळची बातचीत केली होती त्या वेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते किमी लढवणार नाही असे म्हटले आहे आणि ते माझ्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे आहे मात्र राजकारण संन्यास घेतलेला नाही.

दरम्यान स्वराज यांच्या प्रकृतीबाबत एम्स रुग्णालयातर्फे आज मध्यरात्रीच्या सुमारास  निवेदन जारी केले जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच आपली आदरांजली व्यक्त केली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि स्वराज यांच्यात अनेकदा राजकीय मतभेद होऊनही मधील संबंध अतिशय जिव्हाळ्याचे राहिले होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांनीही संदेश दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushma Swaraj, former external affairs minister, passes away at 67