esakal | मॅडम, 46 वर्षांपासून मी तुमच्या मागे धावत आहे....
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Swaraj husband swaraj kaushal write heartfelt letter

मॅडम, गेल्या 46 वर्षांपासून मी तुमच्या मागे धावत आहे. मी आता 19 वर्षांचा राहिलो नाही. मला आता दम लागत आहे. धन्यवाद!

मॅडम, 46 वर्षांपासून मी तुमच्या मागे धावत आहे....

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्लीः 'मॅडम, गेल्या 46 वर्षांपासून मी तुमच्या मागे धावत आहे. मी आता 19 वर्षांचा राहिलो नाही. मला आता दम लागत आहे. धन्यवाद!, सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी पत्नीसाठी लिहिलेले भावनिक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (वय 67) यांचे मंगळवारी (ता. 6) रात्री हृदय विकाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी पत्नीसाठी लिहिलेले एक पत्र व्हायरल झाले आहे.

सुषमा स्वराज यांनी तब्बेतीच्या कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देत सक्रीय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पती स्वराज कौशल यांनी त्यांच्यासाठी एक खास पत्र लिहिले होते. निवडणूक न लढण्याच्या निर्णय घेतल्यामुळे पत्नीचे पत्रातून आभार मानले आहे. पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'मिल्खा सिंग यांनीही यापुढे धावायचे नाही, असा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाची मला आज आठवण झाली. तुझी राजकीय मॅरेथॉन 1977 पासून सुरु झाली. या मॅरेथॉनदरम्यान तू 11 निवडणुका लढलीस. खरं तर तेंव्हापासूनच्या सर्व निवडणूका तू लढली. अपवाद होता तो फक्त 1991 आणि 2004चा. पक्षाने त्यावेळी तुला निवडणूक लढू दिली नव्हती. लोकसभेत चार वेळा, राज्यसभेत तीन वेळा आणि विधानसभेमध्ये तीनवेळा निवडूण आलीस. तू वयाच्या 25व्या वर्षांपासून निवडणूका लढत आहेस. गेल्या 41 वर्षांपासून तू निवडणुक लढत आहेस ही खरोखरच एक प्रकारची मॅरेथॉनच झाली. मॅडम, गेल्या 46 वर्षांपासून मी तुमच्या मागे धावत आहे. मी, आता 19 वर्षांचा राहिलो नाही. मला आता दम लागत आहे. धन्यवाद!'

कॉलेजच्या दिवसांत बहरलं प्रेम....
सुषमा व स्वराज कौशल यांची भेट चंढीगडमधील लॉ कॉलेजमध्ये झाली. तिथूनच त्यांचे प्रेम फुलण्यास सुरवात झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रथम सुषमा यांना घरून खूप विरोध झाला. त्यांना आपल्या घरच्यांची समजूत घालावी लागली. बऱ्याच प्रयत्नांनी सुषमा यांनी आपल्या घरच्यांची समजूत काढून विवाहास परवानगी मिळवली आनंदाने विवाहबद्ध झाल्या. सुषमा यांचे पती स्वराज हे सर्वोच्च न्यायलयात प्रतिष्ठित वकील आहेत. स्वराज यांना वयाच्या 34 व्या वर्षी अॅडव्हॉकेट जनरल पदावर नियुक्त करण्यात आले होते. ते सर्वात कमी वयाचे अॅडव्हॉकेट जनरल ठरले. तर वयाच्या 37 व्या वर्षी ते मिझोरमचे राज्यपाल झाले. त्यांनी 1990 ते 1993 या तीन वर्षांसाठी राज्यपाल पद भूषवले.

loading image